Saturday, April 15, 2023

शिक्षण आणि शारीरिक शिक्षण

 

शिक्षण :

    शिक्षण हि जीवनभर चालणारी प्रक्रिया आहे. आजचे शिक्षण औपचारिक बनलेले आहे. तरीदेखील काळाच्या ओघात त्यात बदल होत आहे. थोडक्यात (शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्ती विकास आणि सामाजिक विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो.)ज्यामुळे व्यक्तीच्या सामाजिक दुर्जात, चारित्र्यात, कला कौशल्यात आर्थिक स्थितीत बदल घडून येतो. शिक्षण मानवी जीवनाला व्यापणारे आहे. म्हणूनच ते मानवी जीवनाइतके प्राचीन आहे.

शिक्षणाचा अर्थ :

     शिक्षण म्हणजे ज्ञान, विद्या, कौशल्य, संस्कार, सदवर्तन, संस्कृती मूल्यांची जोपासना आणि पुढील पिढीला वारसा देण्याचे एक साधन आहे. आपल्याला शिक्षण म्हणजे शिकणे / शिकवणे एवढाच संकचित अर्थ माहिती आहे. मात्र हा अर्थ एवढा संकुचित नाही. कारण ही एक व्यापक प्रक्रिया आहे. ज्यामुळे परिवर्तन, बदल घडवण्याचा मार्ग सापडतो.

शिक्षणाच्या व्याख्या :

स्वामी विवेकानंद :
     यांच्या मतानुसार मानवात असलेल्या सुप्त आणि बिजस्ती क्षमतांचा विकास म्हणजे शिक्षण होय.
व्यक्तीला स्वावलंबी आणि स्वार्थ निरपेक्ष बनवते ते शिक्षण.

महात्मा गांधी :
     मूलभूत सुप्त अवस्थेत असलेल्या क्षमतांचा विकास करून व्यक्तींचा सर्वागिण विकास करणे म्हणजे शिक्षण होय.

सारांश :

     वरील सर्व व्याख्यांचा एकत्रित विचार केला असता "व्यक्तीच्या ठिकाणी असलेल्या उपजर सुप्त शक्तिचा विकास करणे व अनुभूतीदवारे शारीरिक, मानसिक, नैतिक, सामाजिक म्हणजेच समतोल सर्वांगिण विकास करणे" म्हणजे शिक्षण होय.

शारीरिक शिक्षण :

     शारीरिक शिक्षण हा विषय मानवाच्या जन्मापासूनच सुरु झाला आहे. म्हणून हा विषय तसा जुनाच आहे. शारीरिक शिक्षण हे शिक्षणच आहे. तो शिक्षणाचा अविभाज्य आहे. शिक्षण या संज्ञेत येणारे सर्व विचार, कल्पना, तत्वे, शास्त्र या सर्वांचा समावेश शारीरिक शिक्षणामध्ये आहे. परंतु शारीरिक शिक्षणाच्या अर्थाबद्दल व व्याख्येबद्दल वेगवेगळी मते मांडली आहेत!

शारीरिक शिक्षणाचा अर्थ :

     शारीरिक शिक्षणाचा शब्दश: अर्थ "शरीराचे शिक्षण किंवा शरीराद्वारे दिले जाणारे शिक्षण." असे म्हणता येईल. पण या अर्थामध्ये फक्त शरीराचाच विचार दिसून येतो. मानवाला शिक्षण घेण्याच्या अनेक माध्यमांपैकी शरीर हे एक माध्यम आहे. म्हणूनच शारीरिक हालचालीचे शिक्षण म्हणजे शारीरिक शिक्षण होय, असे म्हटले जाते. यामध्ये शरीर हालचाल, मानसिक, बौद्धीक, भावनिक, सामाजिक, अरोग्य आणि मनोरंजन या सर्वांचा समावेश शारीरिक शिक्षणामध्ये आहे.

शारीरिक शिक्षणाच्या व्याख्या :

मार्शल ग्रिज : 
      यांच्या मते "शारीरिक शिक्षण" ही एक अधिक व्यापक अशी शिक्षण प्रक्रियाची एक बाजू आहे या विचाराचा आधार घेऊन शारीरिक शिक्षणा बद्दल अनेक व्याख्या सांगितल्या आहेत ते पुढीलप्रमाणे:-

डेल बर्ट :
     यांच्या मते "विविध शारीरिक हालचालींद्वारा व्यक्तीला मिळणाऱ्या अनुभवांचे संघटन / ज्ञान म्हणजे शारीरिक शिक्षण होय."

आर कॅसिडी :
     यांच्या मते "विविध गतीमान शारीरिक प्रक्रियेतून (हालचाली मधून) मिळणाऱ्या अनुभवामुळे व्यक्ती मध्ये होणाऱ्या वर्तनातील बदलाच्या क्रियेस शारीरिक शिक्षण असे म्हणतात."

डॉ. जे.बी. नॅश :
     यांच्या मते "शारीरिक शिक्षण हा संपूर्ण शिक्षणाचा एक भाग आहे, ज्याचा संबंध महत्त्वाच्या स्नायूंच्या हालचालीशी संबंधित असणाऱ्या क्रियाशी आहे."

चार्ल्स एबुज :
     यांच्या मते "शारीरिक शिक्षण हा पूर्ण शिक्षण प्रक्रियेचा एक भाग आहे. त्याचे मुख्य ध्येय म्हणजे शारीरिक हालचालींच्याद्वारे बालकाच्या शारीरिक, मानसिक, भावनिक सामाजिक बाबींचा विकास करून त्यास आदर्श नागरिक बनविणे असे आहे."

सी.सी. कॉवेल :
     यांच्या मते "शारीरिक शिक्षण ही एक सामाजिक प्रक्रिया आहे. स्नायूवर्धक हलचाली व सांघिक खेळातून व्यक्तिच्या वर्तनुकीत बदल घडवून आणला जातो." त्यास शारीरिक शिक्षण म्हणतात.

सारांश :
     अशा अनेक व्यक्तींनी शारीरिक शिक्षणाबद्दल व्याख्या सांगितल्या आहेत. या तज्ज्ञांच्या विचाराचा आधार घेऊन शारीरिक शिक्षणाबद्दल अशी परिभाषा आपणास सांगता येईल की, शरीराच्या माध्यमातून शारीरिक, मानसिक, भावनिक, बौधिक आणि सामाजिक विकास किंवा व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगिण विकास करणे म्हणजे शारीरिक शिक्षण होय.

शिक्षण आणि शारीरिक शिक्षण

  शिक्षण  :     शिक्षण हि जीवनभर चालणारी प्रक्रिया आहे. आजचे शिक्षण औपचारिक बनलेले आहे. तरीदेखील काळाच्या ओघात त्यात बदल होत आहे. थोडक्यात (...